Download App

वाल्मिक कराडला ‘उच्च’ दिलासा! ईडी चौकशी होणार नाही…

वाल्मिक कराडला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावलीयं.

Walmik Karad ED Inquiry : संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलंच चर्चेत आलंय. या प्रकरणात संशयित असलेला आरोपी वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलीयं. वाल्मिक कराडने बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. वाल्मिकची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात होती. वाल्मिकवर ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करुन तपास करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली. मात्र, वाल्मिक कराडविरोधाती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीयं. त्यामुळे आता वाल्मिक कराडला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलायं.

धक्कादायक! संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडविरोधात ईडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ईडी चौकशीच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरु करण्याचीही मागणी करण्यात आली. कॅबिनेट मंत्र्यामुळे तपासात अडथळा येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

नंदुरबारध्ये रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं; बांबूच्या झोळीतून 15 किमीचा प्रवास

वाल्मिक कराडविरोधात उच्च न्यायालयात दाखल असलेली याचिका फेटाळण्यात आलीयं. याचिकाकर्त्यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20 हजारांचा दंड ठोठावण्याचे स्पष्ट करताच याचिकाकर्त्याने याचिका माघारी घेण्याचे मान्य केलं आहे. याचिकाकर्त्याचा मुख्य हेतू स्पष्ट होत नसल्याने संबंधित याचिका सुनावणीला योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे.

follow us