अहमदनगर : छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन शनैश्वरांची तेल वाहत विधिवत पूजा करण्यात आली. या संदर्भात स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की,’करवीर संस्थापिका ताराराणी साहेब यांचा संघर्षाचा आणि क्रांतीचा वारसा पुढे चालवत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन शनैश्वरांची तेल वाहत विधिवत पूजा केली.’
Dhananjay Munde यांचे स्वागत कट्टर समर्थकाला भोवले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
त्या ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अनेक अनिष्ट प्रथा व रूढींना पायबंद घातला होता, त्यांचाच वारसा संयोगिताराजे छत्रपती यांनी पुढे चालवत महिलांना चौथ-यावर न जाण्याच्या प्रथेला बगल दिली. यावेळी शनैश्वर देवस्थानचे चिटणीस आप्पासाहेब शेटे यांनी संयोगिताराजे यांच्या कृतीचे कौतुक केले.
ते म्हणाले, संयोगीताराजेंनी अतिशय शांतपणे देवाचे दर्शन घेतले, कुठल्याही प्रकारे वेगळेपण न दाखवता पुर्वापार चालत आलेल्या अनिष्ट प्रथेला थारा न देता चौथ-यावर जाऊन शनैश्वराचे मनोभावे पूजा करत आशिर्वाद घेतला. संयोगिताराजे छत्रपती यांनी आदर्श घालून देत आज नवा आयाम जनतेला दिला आहे. खरोखरपणे इतक्या चांगल्या पद्धतीने समाजाला नवी दिशा देता येते हे दाखवून दिले.’
शनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन शनैश्वरांची पूजा करण्याची महिलांना परवानगी नव्हती पण मागच्या काही काळात महिलांना या चौथऱ्यावर जाऊन पूजा करू दिली जावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां तृप्ती देसाई यांच्याकडून आंदोलन करण्यात आली त्यानंतर चौथऱ्यावर जाऊन शनैश्वरांची पूजा करण्याची महिलांना परवानगी देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र तरी देखील महिलांनी शनीची पूजा करू नये या समजातून महिला अजूनही चौथऱ्यावर जाऊन शनैश्वरांची पूजा करत नाहीत. पण आता थेट छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्याकडून शनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन शनैश्वरांची तेल वाहत विधिवत पूजा करण्यात आली.