Dhananjay Munde यांचे स्वागत कट्टर समर्थकाला भोवले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Dhananjay Munde यांचे स्वागत कट्टर समर्थकाला भोवले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

बीड : अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे परळीत परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी डीजे, विद्युतरोषणाई आणि 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करत मुंडे यांचे जंगी स्वागत केले. मात्र मुंडेंचे जंगी स्वागत करणे त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंडेंच्या समर्थकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला 4 जानेवारी रोजी परळी शहरात भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत मुंडे यांना जबर मार लागला होता. तसेच ते गंभीर जखमी झाले होते. मुंडे यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचार घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी मुंबईतील निवास्थानी विश्रांती घेतली. त्यानंतर महिनाभराने ते रविवारी परळी शहरात परतले होते. उपचारानंतर परळीत परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत देखील केले.

या कार्यक्रमासाठी पोलिसांनी रात्री दहा पर्यंतची वेळ दिली होती. मात्र मुंडेंची मिरवणूक आणि भाषणामुळे वेळ 12 च्या पुढे केली. यावर पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक तथा धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या वेळेत कार्यक्रम आटोपला नाही आणि त्यामुळे पोलिस अमंलदार विष्णू फड यांच्या तक्रारीवरून आयोजक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे आपले नेते गावी परतल्याच आनंद साजरा होत असताना दुसरीकडे समर्थकावर गुन्हा दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

प्राजक्ता माळीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ लूक पाहिलात का

ग्रँड वेलकम
क्रेनने भला मोठा हार, जेसीबीतून फुलांची उधळण, डीजेचा दणदणाट आणि त्यात माझा शेवटचा श्वास देखील परळीकरांच्या सेवेसाठी समर्पित असेल, असे आमदार धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या या ग्रँड वेलकमची चर्चा राज्यभर झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube