Jaykumar Gore Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी माण सोसायटी गटातून विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत 53 मते मिळवली. विशेष म्हणजे, या लढतीत त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते शेखर गोरे (Shekhar Gore) हेही उमेदवार होते. मात्र, त्यांना केवळ 7 मते मिळाल्याने जयकुमार गोरेंनी त्यांच्यावर मात केली.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक राहुरीतून आमदार प्राजक्त तनपुरे विजय
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोज पोळ (Manoj Pol) यांनीही जयकुमार गोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे माण सोसायटी गटातील या तिरंगी लढतीत जयकुमार गोरे यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.
ब्रेकिंग: सांगली जिल्हा बँक निवडणूक गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी!
गोरे बंधूंमधील लढतीची राजकीय वर्तुळात चर्चा
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माण सोसायटी गटातील लढत विशेष चर्चेत होती. कारण या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे आमनेसामने आले होते. दोन्ही बंधूंच्या राजकीय भूमिकांमुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, मतमोजणीनंतर जयकुमार गोरे यांनी 53 मतांसह विजय मिळवला, तर शेखर गोरे यांना अवघ्या 7 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील माण सोसायटी गटाची लढत विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणूक; अटीतटीच्या लढतीमध्ये पालकमंत्री शुंभूराज देसाई विजयी
