Video : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?

Satara Politics नाशिकमधील कॅप्टन खरातच्या 58 व्हिडिओंचा थरार शांत होतो न होतो, तोच साताऱ्यात सत्तेसाठी 'रक्तरंजित' राजकारण पाहायला मिळालं.

Satara Politics : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?

Satara Politics : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?

Cinematic Style Drama In Satara Zilla Parishad : नाशिकमधील कॅप्टन खरात यांच्या 58 व्हिडिओंचा थरार शांत होतो न होतो, तोच साताऱ्यात सत्तेसाठी चक्क ‘रक्तरंजित’ राजकारण पाहायला मिळालं. भाजप आणि शिवसेना महायुतीत मित्र असले, तरी साताऱ्यात मात्र भाजपने आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्यावर पोलिसी बळाचा वापर केला. मंत्री शंभूराज देसाई जेव्हा आपल्या सदस्यांना वाचवण्यासाठी ढाल बनले, तेव्हा त्यांनाच धक्काबुक्की करण्यात आली यात ते जखमीदेखील झाले. सिनेस्टाईल या राड्यामध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि भाजप उमेदवार प्रिया शिंदे अवघ्या एका मताने विजयी तर झाल्या. पण, सत्तेच्या खूर्चीसाठी मित्रपक्षाच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपचा हा ‘साताऱ्याचा सुलतानी’ डाव नेमका काय होता? पाहूया या रिपोर्टमध्ये…

Ashok Kharat : सोलापुरात ऑपरेशन परिवर्तन ते पुणेकरांना शिस्त; कॅप्टनचा ‘गेम’ ओव्हर सातपुते करणार

निवडणूक की ‘क्राईम थ्रिलर’ सिनेमा?

साताऱ्यात आज निवडणूक नव्हती, तर जणू एखादा ‘क्राईम थ्रिलर’ सिनेमा सुरू होता. भाजप आणि शिवसेना महायुतीत मित्र असले, तरी साताऱ्यात मात्र भाजपने आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्यावर पोलिसी बळाचा वापर केला. मंत्री शंभूराज देसाई जेव्हा आपल्या सदस्यांना सुरक्षित सभागृहात घेऊन जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. याच झटापटीत मंत्री देसाईंच्या हाताला दुखापत झाली. सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच मंत्र्याला जखमी करण्यापर्यंत भाजपची मजल गेल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. Cinematic Style Drama In Satara Zilla Parishad

शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील बनले ‘ढाल’

भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना पळवण्याचा किंवा अडवण्याचा मोठा ‘कथित प्लॅन’ आखण्यात आला होता. मात्र, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील ढाल बनून उभे राहिले. त्यांनी स्वतःच्या खासगी गाड्यांतून सदस्यांना सुरक्षित सभागृहात पोहोचवून भाजपची ‘फिल्डिंग’ हाणून पाडली. कामेस कांबळे आणि अनिल देसाई यांसारख्या सदस्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली संपूर्ण ताकद लावून सदस्यांना सुखरूप पोहोचवले.

राऊतांचे खबरी एक दिवस त्यांनाच अडचणीत आणतील : मंत्रिमंडळातील गँगवॉरवर शंभुराज देसाईंचा खुलासा

33 विरुद्ध 32 चा थरार

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने अध्यक्षपदासाठी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांना उमेदवारी दिली होती. प्रिया शिंदे या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष असून त्या खटाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडूनच निवडून आल्या आहेत.

दहशतीच्या वातावरणात पार पडलेल्या या मतदानात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या 33 मते मिळवून अवघ्या एका मताने विजयी झाल्या. तर, विरोधात उभ्या असलेल्या मनीषा फडतरे यांना 32 मते मिळाली. एका मताने जरी भाजपने खुर्ची मिळवली असली, तरी ही खुर्ची मिळवण्यासाठी भाजपने जी नीतिमत्ता वापरली, त्याने महायुतीमध्ये कधीही न भरून निघणारी दरी निर्माण केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव टाली, रुपाली ठोंबरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

महायुतीचे जहाज वादळात अडकणार?

साताऱ्यातील या विजयाने भाजपच्या गोटात जल्लोष असला, तरी शिवसेनेच्या गोटात मात्र संतापाचा ज्वालामुखी धगधगतोय. सत्तेसाठी मित्रपक्षाला पायदळी तुडवणाऱ्या भाजपच्या या भूमिकेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय ॲक्शन घेणार? साताऱ्यातील हा राडा राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार? आणि महायुतीचं जहाज या वादाच्या वादळात टिकणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version