राऊतांचे खबरी एक दिवस त्यांनाच अडचणीत आणतील : मंत्रिमंडळातील गँगवॉरवर शंभुराज देसाईंचा खुलासा

राऊतांचे खबरी एक दिवस त्यांनाच अडचणीत आणतील : मंत्रिमंडळातील गँगवॉरवर शंभुराज देसाईंचा खुलासा

मुंबई : कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत किंवा कोणी कोणाच्या अंगावरही गेले नाही. अत्यंत खेळीमेळीत चर्चा झाली. मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षण मुद्द्यावर काही वक्तव्य माझ्याकडून आणि काही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आली. पण यापुढे विसंगती करणारी वक्तव्य करु नये असे फक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेच बोला, सगळ्यांची भूमिका एकच आहे यासंदर्भात चर्चा झाली, असे स्पष्टीकरण मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. (minister Shambhuraj Desai criticizes MP Sanjay Raut over the gang war in the cabinet)

मंत्रिमंडळ बैठकीत गँगवॉर होत असून, जोरदार भांडणं होत आहेत. मंत्री एकमेकांच्या अंगावर धाऊन जात आहेत एवढे वातावरण खराब झाले आहे, असे म्हणत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्या-मंत्र्यांमध्येच वाद झाल्याचा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राऊतांचे खबरे त्यांना अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो, जे घडलं नाही ते भासवले जाते, हे आम्हाला आश्चर्य वाटते, पण त्यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांनी खासदार राऊत यांच्यावर टीका केली.

कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील; राऊतांनी सांगितलं मंत्रिमंडळातील इनसाईड गँगवॉर

काय म्हणाले होते संजय राऊत?

मराठा आरक्षणावर बोलताना राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपसह कोणीच जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही.

दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद?; प्रसाद लाड यांचा सवाल

24 डिसेंबरनंतर काय होईल हे कोणी सांगू शकत नाही

मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. त्यामुळे 24 डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही.जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल. छगन भुजबळ मंत्री आहेत, ते ओबीसी समाजाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे जर माहिती असेल त्यांनी ती पोलिसांना द्यावी, मुख्यमंत्र्यांकडे द्यावी समोर ठेवावी हवेत गोळीबार करून काय उपयोग असेही राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube