कोल्हापूर : कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि महादेव महाडिक, अमल महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचला आहे. श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कुस्ती लढायची असेल तर मैदानात या असे थेट आव्हान आता सतेज पाटील यांनी महादेव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांना दिले आहे.
सतेज पाटील म्हणाले की, कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी मागं पडणार नाही. महाडिक यांच्या घरातील व्यक्तींनी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घ्यावी. उमेदवारांमध्ये लढाई होऊ द्या. कारखान्यावर २१ संचालक कोण असतील याचा निर्णय १२ हजार सभासदांना घेऊ द्या,असं आव्हान सतेज पाटील यांनी महादेव महाडिक यांचे नाव न घेतला दिलं आहे.
तुम्हाला जर एवढीच खुमखूमी आहे. तुम्ही सभासदांचा चांगला कारभार केला आहे, तर मग मैदानात या. उद्याच्या उद्या मैदानात या. जरी सतेज पाटील पॅनलमध्ये नसला, तरी आमचे २१ उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय शांत बसणार नाही, असे सांगत सतेज पाटील म्हणाले, गोकुळमध्ये मी संचालक कधी झालो नाही. महाडिकांनी गोकुळमध्ये स्वतःच्या कुटुंबातील माणसं बसवलीत,” अशी टीका केली आहे.
(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube