Download App

सतीश भोसलेचं घर कोणत्या नियमाने पाडलं; खोक्याच्या कुटुंबाला भेटत सुरेश धसांचा वनविभागाला सवाल

Satish Bhosale च्या घरावर वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर आता धस यांनी स्वत: त्याच्या कुटुंबाची भेट घेतली.

Satish Bhosale’s house demolished Suresh Dhas questions forest department : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला आहे. वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर आता धस यांनी स्वत: त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी धस यांनी वनविभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता? असा सवाल केला आहे.

जितेंद्र जोशी तुम्ही कमाल केली! संकर्षणची भावूक पोस्ट, नाटक धर्माला जागणारी वृत्ती…

धस म्हणाले की, वनविभागाने हे घर पाडलं कोणत्या नियमाने केलं. त्याची उत्तरे मिळणे गरजेचं आहे. तो एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून दाखवला.
त्याची परिस्थिती काय झाली हे बघा त्याला राहायला घर नाही. जे त्याला त्याची शिक्षा मिळाली होती. त्याच्यावर 307 झाला आहे तो अटकही झाला आहे.
मात्र वनविभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही विचार करू. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न आहे. असं धस म्हणाले.

औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक ; आमदार सत्यजित तांबे

शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड शून्य टक्क्यावर आले. हे लपवण्यासाठी असे कृत्य वनविभागाने केले. मी वनविभाग कायद्यानुसार हे कोणत्या कायद्यानुसार केले याची माहिती घेणार. हे घर साठ वर्षांपूर्वीच आहे. हे कोणत्या नियमात बसते? सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्ती वरून तक्रार दाखल केली होती. कुणाच्या दबावाखाली केले हेच आम्ही बघत आहोत. जिल्ह्यातील जुने व्हिडिओ काढायचे आणि कोणाच्या बदनाम्या करायच्या. असा प्रकार सुरू आहे. देशमुख प्रकरण वळवण्यासाठी सुरू आहे. दादा खिंडकर स्वतः सरेंडर झाला आहे. नसलेला गुन्हा त्याच्यावर टाकला आहे. त्याचे चुकले काय? असा सवाल धस यांनी केला आहे.

follow us