औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक ; आमदार सत्यजित तांबे

औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक ; आमदार सत्यजित तांबे

Satyajit Tambe Said Aurangzeb stain on history of Maharashtra : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून मोठं लोण उठलंय. अनेक राजकीय नेते कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर अनेकांनी कबर उखडून टाकू नये म्हणून वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान आता आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय.

औरंगजेब हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक आहे, असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचे राज्य उभे राहिलं. त्यात आपण आज जे वेगवेगळे ठिकाणी औरंगजेबाचे उद्दातिकरण पाहत आहोत, त्याची मुळीच गरज नाही. किंबहुना औरंगजेबाचा नाव देखील महाराष्ट्रात कोणी घेऊ नये. औरंगजेब आपल्या महाराष्ट्रात एक कलंक आहे आणि त्याची वारंवार आठवण काढणे चुकीचे, आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.

ठाण्यात सर्वात जास्त सिनिअर मंत्री मी; नाईकांच्या वक्तवाने शिंदे-फडणवीसांतील शीतयुद्धाच्या चर्चांना दुजोरा

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, सध्या एक स्पर्धेचं युग तयार झालं आहे. त्याच्यातून आपण एकमेकांवर टीका करत असतो. कधीतरी कुणाला औरंग्या म्हणणं, याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीर भाषणातून औरंग्या हा शब्दप्रयोग केलाय. त्यामुळे आता लगेच भूमिका बदलण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा नाम उल्लेख करण्याची गरज नाही, असं देखील सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

बीड पुन्हा पेटले! थरकाप उडवणाऱ्या हत्या-आत्महत्यांची मालिका; सुप्रिया सुळे अमित शाहंना भेटणार

सत्यजित तांबे म्हणाले की, शिवेंद्र राजे यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्याचे उद्दातिकरण हे सर्वच राजकीय पक्षांनी जाती धर्माच्या लोकांनी केलेले आहे. सर्वजण आणि महाराष्ट्रधर्म पाळलेला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी शिवाजी महाराजांचा आदर करत त्यांना दैवतच मानलेले आहे. त्यामुळे कोणीही केलं,कुणी ते केलं म्हणण्यात काही अर्थ नाही असं देखील सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube