Download App

लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात काय?   

  • Written By: Last Updated:

Satyajeet Tambe On Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले असून उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र यामध्ये गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ असलेले व सध्या अपक्ष असलेले आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे मात्र लोकसभा निवडणुकीपासून दूर असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना योग्य वेळी मी माझी भूमिका मांडणार असे सूचक विधान यावेळी सत्यजित तांबे यांनी केले.

नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची नावे ही जाहीर झाली आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही गटातील उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील आता सुरू झाला आहे. दोन्ही गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील कंबर कसले असून ठिकठिकाणी सभा घेत जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र हे सगळे सुरू असताना सत्यजित तांबे हे लोकसभा निवडणुकीपासून अद्याप दूर असल्याचे दिसते आहे.

दरम्यान यावरती बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुक ही तिसऱ्या टप्प्यात असून याला अद्याप वेळ आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये आठ मतदारसंघ असून नगर लोकसभेला अद्याप वेळ आहे. मी माझी भूमिका योग्य वेळी मांडेल. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रमध्ये मला मानणारा एक मोठा युवक वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मतदार निहाय कशी भूमिका घ्यायची याबाबत मी योग्य वेळ आली की माझी भूमिका स्पष्ट करील असं यावेळी बोलताना तांबे म्हणाले.

पक्षांप्रमाणे उमेदवारांनी ही जाहीरनामे सादर करावे

निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून आपापली जाहीरनामे प्रसिद्ध केली जात आहे. मात्र राजकीय पक्षांप्रमाणेच आता उमेदवारांनी देखील आपली जाहीरनामे सादर करावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे. काँग्रेस भाजप त्यांनी आपापली जाहीरनामे प्रसिद्ध केले आहे.

उमेदवारांनी देखील आपण स्थानिक पातळीवरती काय काय करणार आहोत याबाबतचे जाहीरनामे प्रसिद्ध केले पाहिजे. त्यानंतर जनता ठरवेल की कोणाला मतदान करायचे असं देखील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे म्हणाले.

follow us