मुंबईतील वांद्रे-वर्सोवा समुद्र सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Wrestlers Protest : ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल…
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिनाचे उपक्रम यापुढे सुरुच राहणार असून आजच्या जयंतीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि समुद्राचं जे काही नातं आहे ते लक्षात घेऊन वांद्रे इथल्या समुद्र सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
तसेच राज्यात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ‘सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आहे. यावेळी संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याबद्दल माध्यमांनी विचारलं असता त्यांनी भाष्य केलं आहे.
राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले
अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले आमच्यासाठी पूज्यनीय असून त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, त्यांचा अनादर करण्याचं होणार नाही, याबद्दल कुणीही गैरसमज करुन घेऊ नये ते आमच्यासाठी आदरस्थानी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मृत्यूला अनेक वर्ष उलटून गेले तरी इथल्या लोकांना अद्याप सावरकर समजलेले नाहीत. काही लोकं जाणीवपूर्वक सावरकरांचा अवमान करीत आहेत, सावरकरांचा हा अवमान चीड आणणारा असल्याचं ते म्हणाले आहेत.
सावरकर जयंतीदिनी मिळणार नवीन संसद; 21 पक्षांचा बहिष्कार, शेकडो संतांची उपस्थिती
तसेच सावरकरांवर इंग्रजांनी अनेक अत्याचार केले पण सावरकरांनी कधीही तडजोड केलेली नाही. सावरकरांचा त्याग हेच विरोधकांसाठी चोख उत्तर आहे. त्यांच्याविषयीची दहशत आजही अनेकांच्या मनात तशीच आहे, म्हणूनच ते वारंवार त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक वक्तव्ये करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर आपला बाजार कायमचा उठेल, अशी भीती विरोधकांच्या मनात आहे. भारत देश हा हिंदुंचा देश हिंदुंच्या नावानेच ओळखला गेला पाहिजे, असा सावकरांचा आग्रह असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.