School Bus Hike in Maharashtra : शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केलेली असते. या स्कूलबसचे भाडे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दिले जाते. परंतु, आता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला झटका बसणार आहे. कारण शालेय स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बस मालकांनी घेतला आहे. राज्य सरकारने बस भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कूल बस मालकांनीही शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खर्च आणखी वाढणार आहे.
बसच्या स्पेअर पार्ट्सच्या वाढत्या किंमती, विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणा, चालक, महिला व परिचारिका आणि व्यवस्थापकांचे वेतन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळाच्या शुल्कात वाढ अशा कारणांमुळे ही शुल्क वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सेवा देण्यासाठी 2025 मध्ये 18 टक्क्यांनी शुल्क वाढ करण्यात येणार आहे, अशी माहती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
एसटीची तब्बल 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. नवी भाढेवाढ लागूही केली आहे. या निर्णयामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्यांवर आर्थिक ताण येणार हे नक्की आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर मोठी टीका केली. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला प्रतिदिन तीन कोटी रुपये नुकसान होते, डिझेलचा खर्च, मेन्टेन्सचा खर्च वाढला आहे ही आणि अशी विविध कारणे देत भाडे वाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाची स्थिती काही चांगली नाही. मासिक उत्पन्न आणि खर्च यांचे गणित जुळत नाही, एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीला दिवसाला तीन कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे भाडे वाढ अपरिहार्य आहे.
दररोज 55 लाख प्रवासी एसटीचा प्रवास करतात. याद्वारे महामंडळाला प्रतिदिन जवळपास 23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण यामध्ये सवलतीच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एसटीमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना, 75 वर्षांपर्यंतच्या महिलांना आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ पुरुषांना 50 टक्के सवलत आहे. याशिवाय विद्यार्थी आणि नोकरदारांचे मासिक पास, विविध पुरस्कार्थी, अंध व अंपग व्यक्ती, विविध आजारांनी ग्रासलेले रूग्ण अशा जवळपास तीन डझन सवलती दिल्या जातात.
डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मेडिकलमध्ये वाढणार 10 हजार जागा; सरकारी शाळांत अटल लॅब..