Download App

बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Ahmednagar Accident News: नगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ahmednagar ) शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. (Ahmednagar Accident ) राहुरीकडून संगमनेरकडे हि बस जात असताना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये बसचे एक्सेल तुटले व हा अपघात झाला. या बसमध्ये शेलार विद्यार्थी प्रवास करत होते. (Ahmednagar Police) दरम्यान या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाश्याना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आज मंगळवार (दि.२६ डिसेंबर) रोजी सकाळी एस.टी.महामंडळाची राहुरीकडून संगमनेरकडे येणारी बस संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये आली. याचवेळी बसचे एक्सेल हे अचानक तुटले. यामुळे बस हि रस्त्याच्या खाली जात पलटी झाली. या बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातामध्ये काही विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुदैवाने विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असून या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे असे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे म्हणाले आहे.

‘प्रेम विवाह अन् जोडप्यांना’ मिळणार पोलिसांचे कवच : “सैराट” रोखण्यासाठी गृहविभागाचा मोठा निर्णय

लालपरीची दुरावस्था…

कोणत्या ना कोणत्या कारणावरून महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच लालपरी हि वादात सापडत असते. त्यातच राज्यातील बसेसची अवस्था हि सगळ्यांचं परिचित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नोकरी निमित्ताने शहरात ये-जा करण्यासाठी या बस महत्वाच्या ठरतात. मात्र बसेसची वाढलेली दुरावस्था पाहता प्रवाशी देखील आता त्रासले आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांचे हित सदैव जोपासने आवश्यक असून चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देणे आवश्यकच असून जनतेचा तो अधिकार आहे. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता प्रवाश्यांकडून होत आहे.

Tags

follow us