Download App

Educational News : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद राहण्याची शक्यता…

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुटी मिळणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वांत मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखांहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा या वेळी बंद राहणार आहेत.

‘Eknath Shinde vs Uddhav Thackeray : सत्तासंघर्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिक्षकांसाठी 3 दिवसांची विशेष रजा
राज्य शासनाने या अधिवेशनास उपस्थित राहणार्‍या शिक्षकांसाठी 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व 19 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुटी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे.

Tags

follow us