Download App

Inter Cast Marriage Couple : लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं टेन्शन मिटलं! सरकारचा मोठा निर्णय…

Inter Caste Marriage : राज्यात ऑनर किलिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा पाऊल टाकण्यात आलं आहे. आंतरजातीय (Inter Caste Marriage) किंवा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकार सुरक्षागृह देणार असल्याचं गृहखात्याकडून (Ministery Of Home Affairs) स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या प्रसिद्धीपत्रकानूसार गृहविभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्न करणाऱ्या प्रेमीयुगुलांना सरकारचं सुरक्षाकवच असणार आहे.

Japan : 33 हजारांहून अधिक घरांची ‘बत्ती’ गुल; भारताकडून आपत्कालीन हेल्पलाईन नंबर्स जारी

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्षाची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विशेष कक्षाचा त्रैमासिक आढावा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, आयुक्त घेणार आहेत. या कक्षाचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त असून समाजकल्याण अधिकारी आणि महिला बाल विकास अधिकारी सदस्य असणार आहेत. आंतरजातीय लग्न करणाऱ्या विशेष कक्षात असणाऱ्या जोडप्याची माहिती कक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Shirdi News : साईंच्या दर्शनानं नवं वर्षाची सुरुवात, शिर्डीत लाखो भाविकांची अलोट गर्दी

विशेष कक्ष काय करणार?
ज्या जोडप्याला लग्न केल्यानंतर सुरक्षेचा धोका निर्माण होईल, अशा जोडप्यासाठी सुरक्षागृह पुरवण्याची जबाबदारी विशेष कक्षाची असणार आहे. तसेच या जोडप्याला पोलिस संरक्षणही देण्यात येणार आहे. अशा जोडप्यांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह मिळणार असून प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत सुरक्षागृह एका वर्षांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सुरक्षागृहाची व्यवस्था सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येणार असून गृहखात्याकडून पोलिस संरक्षण देण्यात येईल.

2024 मध्ये शरद पवार ‘चाणक्य’ राहतील का? एकनाथ शिंदे यांचे नवीन वर्ष कसे असेल, जाणून घ्या

दरम्यान, राज्यात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नाच्या प्रकारामुळे अनेक ठिकाणी ऑनर किलिंग झाल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांमध्ये लग्न करणाऱ्या जोडप्याला अधिक प्रमाणात धोका असण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठीच राज्याच्या गृहविभागाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे आता राज्यात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यास सुरक्षागृहासह संरक्षण पुरवलं जाणार आहे.

महिला आयोगाच्या Right To Love च्या मागणीला यश :
हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षागृह देण्यात यावं, अशी मागणी महिला आयोगाकडून करण्यात आली होती. या मागणीनंतर आज अखेर राज्याच्या गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार आता आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा गृह पुरविण्यात येणार आहेत. त्यांच्या राहण्याची, सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकार घेणार आहे.

follow us