Download App

दबाव टाकून देवेंद्र फडणवीसांनी आमचं घर फोडलं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा थेट खळबळजनक आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं असा थेट आरोप काँग्रेसच्या माजी मंत्र्याने केला आहे.

  • Written By: Last Updated:

Madhukarrao Chavan on Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडल्याचं चव्हाण म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune news : नात्याला काळिमा! मामानेच केला भाच्‍याचा खून ;धक्कादायक कारण आलं समोर

लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. मधुकरराव चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळावा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहीत पदाचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा दिला राजीनामा दिला होता.

खाकी वर्दीचा राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडेंची राजकारणात सिंघमगिरी? हा पक्ष करणार जॉईन?

 चव्हाण कुटुंब फुटलं

मधुकरराव चव्हाण हे तुळजापूरमधील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी ते इच्छुक देखील आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये मधुकरराव चव्हाण यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चव्हाण कुटुंब फुटले. याला मधुकरराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना कारणीभूत मानले आहे.

follow us