Pune news : नात्याला काळिमा! मामानेच केला भाच्‍याचा खून ‘धक्कादायक’ कारण आलं समोर

  • Written By: Published:
Pune news : नात्याला काळिमा! मामानेच केला भाच्‍याचा खून ‘धक्कादायक’ कारण आलं समोर

Pune Crime : पुण्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मामानेच आपल्या भाच्याच्या डोक्यात लाकडी ठोकळा मारून अन गळा दाबून खून केला आहे. ही घटना खेड तालुक्‍यातील रासे गावाच्‍या हद्दीत गुरुवारी (दि. १९ सप्टेंबर)रोजी सकाळी उघडकीस आली आहे. संदीप खांडे (वय 40, रा. ठाकर वस्ती, रासे, ता. खेड, जि. पुणे), असं खून झालेल्‍या भाच्‍याचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी सुरेश मेंघळ (वय 36, रा. ठाकर वस्ती, रासे) याला अटक केली असून त्‍याने खुनाची कबुलीही दिली आहे.

Bitcoin Holdings : भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रासे गावात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी सुरेश मेंघळ याला ताब्‍यात घेतल्यावर त्‍याने खुनाची कबुली दिली. मयत संदीप हा आरोपी सुरेश यांचा भाचा असून, या दोघांमध्ये यापूर्वी देखील दारू प्‍यायल्यानंतर दोन-तीनवेळा भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..

काय घडल?

अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी हे मामा-भाचे वाद्य वाजवण्‍यासाठी मुंबईला गेले होते. त्‍यांना प्रत्‍येकी ४४० रुपये मजुरी मिळाली. त्‍यामुळे बुधवारी ते पुन्‍हा दारू प्‍यायला बसले. त्‍यावेळी त्‍यांच्‍यात पुन्‍हा भांडण झालं. यामुळे संतापलेल्‍या मामा सुरेश मेंघळ यांने लाकडी ओंडका संदीप खांडे याच्‍या डोक्‍यात मारला. यामुळे संदीप हा गंभीर जखमी झाला. त्‍यानंतर आरोपी सुरेश इथेच थांबला नाही तर त्याने गळा दाबून संदीप याचा खून केला. गुन्‍हा घडल्‍यावर चाकण पोलिसांनी आरोपीला त्‍वरीत अटक केली. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube