Bitcoin Holdings : भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश
Bhutan Fourth-Largest Government Bitcoin Holdings : काही देशांच्या सरकारांनी या मार्केटमधील सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्येही गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. (Bitcoin) भारताचा शेजारी देश भूतानचाही यामध्ये समावेश आहे. भूतान सरकारकडे 13,000 पेक्षा जास्त बिटकॉइन्स आहेत. या बिटकॉइन्सचे मूल्य 750 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे.
CoinGeckoच्या डेटानुसार, भूतानशी जोडलेल्या क्रिप्टो वॉलेटमध्ये सुमारे 1.5 दशलक्ष डॉलर किमतीचे 650 हून अधिक इथरियम देखील आहेत. बिटकॉइनचा साठा असणारा सर्वात मोठा देश अमेरिका आहे. यूएसएमध्ये 2,13,240 पेक्षा जास्त बिटकॉइन्स आहेत. त्यापाठोपाठ 1,90,000 बिटकॉइन्ससह चीनचा क्रमांक लागतो. या यादीत ब्रिटन (सुमारे 61,000 बिटकॉइन्स) तिसऱ्या स्थानावर आहे. बिटकॉइनचा साठा असलेल्या देशांमध्ये भूतान चौथ्या क्रमांकावर आहे.
अलिकडच्या वर्षांत, भारतातही क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. जास्त कर असूनही, देशात क्रिप्टोकरन्सीमध्ये रस वाढत आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीत भारताची वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांत, नियामकांनी या विभागातील काही कंपन्यांवर कठोर कारवाई देखील केली आहे.
काँग्रेसच्या जागा कुणामुळे वाढल्या? काँग्रेसचं राऊतांना जशास तसं उत्तर
ब्लॉकचेन ॲनालिटिक्स फर्म चैनॅलिसिसने एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी जून ते या वर्षी जुलै दरम्यान, देशात केंद्रीकृत एक्सचेंज आणि विकेंद्रित वित्त मालमत्तेचा वापर वाढला आहे. केंद्र सरकारने क्रिप्टो सेगमेंटविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस, नियमांचे पालन न केल्याबद्दल फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने (FIU) नऊ ऑफशोर क्रिप्टो एक्सचेंजेसना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असे असूनही भारतातील क्रिप्टोकरन्सीमध्ये वाढ होत आहे.