Funeral of Congress leader Vasantrao Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं काल सकाळी निधन झालं. आज नांदेडमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Vasantrao Chavan) खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव चव्हाण यांचे मित्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री डी. पी. सावंत हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
सरपंच ते खासदार! काँग्रेसचं निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड, वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास
नांदेड जिल्ह्यावर शोककळा
आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, नितीन राऊत तसंच भाजपचे नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नांदेडचे स्थानिक नेते. काँग्रेस कार्यकर्ते आणि चव्हाण यांचे समर्थक उपस्थित होते. वसंतराव चव्हाण यांच्यावर हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
राजकीय प्रवास
नायगावचे सरपंच ते नांदेड जिल्ह्याचे खासदार असा वसंतराव चव्हाण यांचा प्रवास राहिलेला आहे. 1978 साली नायगावचे ते सरपंच झाले. 2002 जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. लगेच राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर घेतलं. पुढे 16 वर्षे ते विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिले. 2009 ला अपक्ष निवडणूक लढवत नायगाव मतदारसंघातून ते निवडून आले. 2009 त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा त्यांची विधानसभेवर निवड झाली.