सरपंच ते खासदार! काँग्रेसचं निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड, वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास
Vasantrao Chavan passed away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज निधन झालं. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय हानी झाली आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि भाजपविरोधात लढणारे एक ताकदवान नेते होते. वसंत चव्हाण यांचे निधन हे काँग्रेस पक्षासाठी आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकारणासाठी एक मोठे नुकसान आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या निष्ठेची काँग्रेस पक्षाने नोंद घेत त्यांना लोकसभेत संधी दिली होती.
नांदेडचे खासदर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचं निधन; हैदराबाद येथे सुरू होते उपचार
घरातच राजकारणाचे बाळकडू
वसंतराव चव्हाण यांचा १५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्म झाला होता. त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाले होते.1987 साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर होते. 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेस कडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला मरगळ आली होती. त्या काळात त्यांनी संघर्षांची बाजू घेतली. काँग्रेसकडून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसताना वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 50 हजारावर मतांनी पराभव केला. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी मिळाली होती.
काँग्रेसला पुन्हा उभारी
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वसंत चव्हाण यांना नांदेड लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करून काँग्रेसचे निष्ठावंत आणि ताकदवान नेता म्हणून आपली छाप निर्माण केली होती. दरम्यान, वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक मोठा निष्ठावंत नेता गमावला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोठे योगदान दिले आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील एक सशक्त नेतृत्व संपले आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांच्या या कार्यकाळामुळे काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात बळकटी मिळाली होती.
Natwar Singh: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह काळाच्या पडद्याआड; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वंसतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
जन्म – 15 ऑगस्ट 1954
1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच
1990 – जिल्हा परिषद सदस्य
2002 विधान परिषद सदस्य ( राष्ट्रवादी )
2009 – विधानसभा सदस्य – अपक्ष
2014 – विधानसभय सदस्य – काँगेस
2024 – लोकसभा सदस्य – काँगेस