Natwar Singh: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह काळाच्या पडद्याआड; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Natwar Singh: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह काळाच्या पडद्याआड; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Congress Leader Natwar Singh Passed away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सिंह यांचा जन्म 1931 मध्ये राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात झाला. नटवर सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Hindenburg Research: हिंडेनबर्गच्या आरोपानंतर एक्स अकाउंट केलं लॉक?, सेबी नक्की काय लपवतंय?

अनेक देशांमध्ये सेवा

नटवर सिंह हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA-1 सरकारच्या काळात 2004-05 या कालावधीसाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. 1984 मध्ये, सार्वजनिक जीवनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला. आपल्या 31 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका, पोलंड, इंग्लंड, पाकिस्तान, चीन, जमैका आणि झांबियासह अनेक देशांमध्ये सेवा बजावली.

राजे यादविंदर सिंग यांच्या कन्या

परराष्ट्र सेवेचा 1984 मध्ये राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नटवर सिंग यांनी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातूनही शिक्षण घेतले होते. नटवर सिंह यांचा जन्म 1931 मध्ये राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला. वडिलांचं नाव गोविंद सिंह आणि आईचे नाव प्रयाग कौर होते. ते आपल्या आई-वडिलांचे चौथे पुत्र होते. ऑगस्ट 1967 मध्ये त्यांनी हेमिंदर कौर यांच्याशी विवाह केला. हेमिंदर या पतियाळाचे शेवटचे राजे यादविंदर सिंग यांच्या कन्या आहेत.

व्हिजिटिंग स्कॉलर

नटवर सिंग यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे झाले, ज्या भारतीय राजेशाही आणि उच्चभ्रू लोकांसाठी पारंपारिक शैक्षणिक संस्था होत्या. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून बॅचलरची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि चीनच्या पेकिंग विद्यापीठात काही काळ व्हिजिटिंग स्कॉलरही होते.

महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा शाहांना इशारा

राजकीय कारकिर्द

नटवर सिंग यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर ते 1966 ते 1971 पर्यंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित होते. पुढे निवडणूक लढवण्यासाठी 1984 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. निवडणूक जिंकली आणि १९८९ पर्यंत केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले. नंतर, त्यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-1 सरकारच्या काळात 2004 ते 2005 पर्यंत भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले. नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube