धक्कादायक! कॉंग्रेसच्या नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसह विष प्राशन केलं, उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू…
Congress Leader Pancharam Yadav : काँग्रेसच्या (Congress) एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्या कुटुंबियांसमवेत विष प्राशन करून आत्महत्या केली. या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन केलं. दरम्यान, या चौघांनीही विष प्राशन केल्याचे समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
प्रदेशाध्यक्ष रिपून बोरांनी सोडली ममता बॅनर्जींची साथ, कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार?
छत्तीसगडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (Pancharam Yadav) (वय 65 वर्षे, रा. कोतवाली, जंजगीर क्षेत्र, प्रभाग क्रमांक १०) यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन केले. पोलीस अधीक्षक राजेंद्र जैस्वाल यांनी सांगितले की, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नंदनी यादव (वय 55), मुलगा सूरज यादव (वय 27) आणि नीरज यादव (वय 32) यांच्यासोबत विष प्राशन केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आलं होतं. नीरज यादव यांचा सिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी आणखी इतर तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतेय.
विरोधकांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मविआला निवडणुकीत जनता जोडेच…; CM शिंदेंचे टीकास्त्र
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आपण टोकाचं पाऊन उचलत आहोत, हे कोणाला कळू नये म्हणून या नेत्याने घराचे दोन्ही बाजूचे दरवाजे बंद केले होते, दोन्ही बाजूंनी कुलूप लावले आणि तिसऱ्या ठिकाणी आतून कुलून लावत त्यांनी आत्महत्या केली. एक मुलगी त्यांच्या घरी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. वारंवार आवाज करूनही कोणी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तिला संशय आला आणि तिने आसपासच्या इतर लोकांना याबाबतची माहिती दिली.
पंचराम यादव यांनी 40 लाखांचे कर्ज घेतले
समोर आलेल्या माहितीनुसार, पंचराम यादव हे कंत्राटदाराचे काम करायचे. त्यांनी दोन बँकांकडून 40 लाखांचे कर्ज घेतलं होतं. शिवाय त्यांना हृदयाशी निवडीत आजारही होता. तसंच त्यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा नीरज यादव एका खासगी कंपनीत कामाला होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे कंत्राट घेत होता.