विरोधकांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मविआला निवडणुकीत जनता जोडेच…; CM शिंदेंचे टीकास्त्र
Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राजकोट किल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आक्रमक झाली. मुंबईत महाविकास आघाडीने आज सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केलं. दरम्यान, यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीला जनताच जोडे मारणार, असं शिंदे म्हणाले.
विरोधक ‘चायनीज मॉडेल’ शिवप्रेमी; ‘जोडो मारो मोर्चा’ला नितेश राणेंकडून नवीन नाव
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही खपूवन घेणार नाही, असं म्हणत मविआचे शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. शिवद्रोह्यांना माफी नाही, गद्दारांना माफी नाही, अशी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले सहभागी झाले आहेत.
‘दिघेसाहेब लोकनेते’, मंगेश देसाईंनी सांगितला तो खास प्रसंग…
मविआचं आंदोलन राजकीय हेतून प्रेरित
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अत्यंत वाईट आणि दुःखद घटना आहे. ही बाब आमच्यासाठी संवेदनशील आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त भावनिक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. मात्र या घटलेल्या घटनेचं विरोधक राजकारण करत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे, असं शिंदे म्हणाले.
पुढं बोलतांना ते म्हणाले, कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस सरकारने जेसीबीच्या सहाय्याने तोडला. आता तेच काँग्रेसवालेच आंदोलन करत आहेत. खरंतर या काँग्रेसवाल्यांना चपलेनं किंवा जोड्याने मारलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार आहे, असं शिंदे म्हणाले.