प्रदेशाध्यक्ष रिपून बोरांनी सोडली ममता बॅनर्जींची साथ, कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार?

  • Written By: Published:
प्रदेशाध्यक्ष रिपून बोरांनी सोडली ममता बॅनर्जींची साथ, कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार?

Ripun Bora : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) आसाम प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. एवढंचं नाही तर त्यांनी राजीनामा देतांना पक्षावर जोरदार टीकाही केली. आसाम टीएमसीचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा (Ripun Bora) यांनी रविवारी (दि. 1 सप्टेंबरला) पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

विरोधकांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मविआला निवडणुकीत जनता जोडेच…; CM शिंदेंचे टीकास्त्र 

 

कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले रिपून बोरा हे 2022 मध्येच काँग्रेस रामराम ठोकून ममतांसोबत आले होते. त्यांच्यावर लगेच आसाममध्ये पक्षवाढीची जबाबदारी सोपण्यात आली होती. पण राजीनामा देतांना त्यांनी पक्षाला लोक स्वीकारायला तयार नसल्याचा मोठा दावा केला. रिपून बोरा यांनी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना दोन पानी पत्र लिहून राजीनामा दिला आहे. बॅनर्जी यांना पाठवलेल्या पत्रात बोरा म्हणाले की, तृणमूल काँग्रेस हा केवळ पश्चिम बंगालमधील प्रादेशिक पक्ष असल्याची लोकांची भावना असून ते पक्षाला स्वीकारत नाहीत. आसाममध्ये पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वाकडे अनेक शिफारशी करण्यात आल्या होत्या, पण त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही. राज्यात पक्षामध्ये खूप क्षमता असूनही काही अडचणींमुळे प्रगती होत नसल्याचे बोरा म्हणाले.

विरोधक ‘चायनीज मॉडेल’ शिवप्रेमी; ‘जोडो मारो मोर्चा’ला नितेश राणेंकडून नवीन नाव 

पुढं त्यांनी लिहिलं की, आसामी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती करणे, भूपेन हजारिका यांचे कोलकाता येथील निवासस्थान हेरिटेज साईट म्हणून घोषित करणे, कूचबिहारमधील मधुपूर सतरा हे ठिकाण सांस्कृतिक हब म्हणून विकसित करणे आदी शिफारसी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळं पक्ष सोडत असल्याचं बोरा यांनी म्हटलं.

दरम्यान, बोरा हे राज्यसभेचे माजी खासदार असून ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याशिवाय, आसामच्या तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केलं आहे. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसला राजीनामा दिल्यानंतर आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube