मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं

आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे.

News Photo   2026 02 09T143833.202

मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार सध्या बारामतीत आहेत. बारामतीतून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं सांगितले जात होत. नव्हते. आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार तसेच त्यांचे इतर कुटुंबीय उपस्थित राहणार होते. परंतु आज सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत होता.

शरद पवार यांना सकाळपासूनच खोकला, ताप, सर्दीचा त्रास जाणवत असल्याने सकाळीच डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती. डॉक्टरांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी डॉक्टरंची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेले होते.

शरद पवार यांना आता पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही मिनिटांपूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्यासोबत शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेदेखील आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकादेखील आहे. पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार केले जाणार आहेत.

Exit mobile version