Download App

ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ लेखक, माध्यमतज्ज्ञ, संपादक आणि रंगकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी यांचे मुंबईत निधन झालं. विश्वास मेहेंदळे यांनी पुणे आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली. त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली.

ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ते नाट्यकलावंत आहेत आणि त्यांनी सुमारे १८ पुस्तके लिहिली आहेत.

मराठी भाषेत प्र. के. अत्रेंनंतर सगळ्या माध्यमात काम करणारे बहूमाध्यम तज्ञ म्हणजे डॉ. विश्वास मेहेंदळे. दिल्ली आकाशवाणीवरून पहिल्या मराठी बातम्या वाचणारे निवेदक. केंद्र सरकारच्या सेवेतून प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक, दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे संचालक.

ते संचालक असतानाच ज्या नव्या चेहऱ्यांना बातम्या वाचण्यासाठी निवेदक म्हणून संधी मिळाली. त्यातले एक नाव म्हणजे स्मिता पाटील. नंतरच्या काळात बॉलीवूडमध्ये एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या दिवंगत स्मिता पाटील.

पुढे ते सिंबायोसिस संस्थेच्या वृत्तपत्र विद्या व संज्ञापन संस्थेचे प्रथम संचालक झाले. पुणे तरुण भारतचे संपादक झाले. ईएमआरसीचे संचालक झाले. ई टीव्हीचे संपादक झाले. ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम केला.

दूरदर्शनवर त्याकाळी त्यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्रसिद्ध झालेला ‘वाद संवाद’ हा कार्यक्रम. यशवंतराव ते विलासराव, आपले पंतप्रधान यासह सहा पुस्तकांचे लेखक, काही नाटकात काम देखील केले. माध्यमात काम करणारे अनेक मध्यमकर्मी त्यांचे विद्यार्थी आहेत.

Tags

follow us