दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली; आ. संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध; भाजप आमदाराचा दावा

आमदार संतोष बांगर यांचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा गंभीर आरोप.

santosh banger vs tanhaji mutkule

shivsena vs bjp

Serious Allegations Against Santosh Bangar : भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 खोके घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आमदार मुटकुळे (Mla Tanhaji Mutkule) यांनी पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर (Mla Santosh Bangar) यांच्यावर गंभीर आरोप केला. आमदार बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. मागे जायभाय नावाच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली, मतदारसंघातील अनेक महिलांसोबत बांगर यांचे अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला. मागील बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मागे आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dcm Eknath Shinde) यांच्याकडून 50 खोके घेतल्याचा आरोप देखील आमदार मुटकुळे त्यांनी केला होता.

श्रीलंकेत Cyclone Ditwah ने केला कहर; 47 जणांचा मृत्यू तर 21 जण बेपत्ता

आता त्यात आणखी भर पडली. या सगळ्यात अश्लील शब्दांची सुरूवात कोणी केली? कळमनुरी काय झालंय? या सगळ्यांवर या आमदाराने विचार करायला हवा! जायभाय नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. त्याचप्रमाणे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या तिच्या नवर्याच्या संदर्भात, बायांच्या संदर्भात कळमनुरीमध्ये चर्चा रंगली आहे. त्यामुळे तो आता हिंगोलीमध्ये देखील तास प्रयत्न करतोय. कळमनुरीत आपण काय करतो, तिथल्या किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवतो, हे तपासलं पाहिजे. या सगळ्याचे आपल्याकडे रेकॉर्ड आहेत. असा खळबळजनक दावा करत आमदार मुटकुळे यांनी आमदार बांगर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमदार बांगर यांचे अनेक महिलांसोबत असणारे अनैतिक संबंध आणि जायभाय नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Exit mobile version