..अन्यथा नराधम आमच्या ताब्यात द्या; पिंपरी चिंचवडच्या शाळेत बदलापुरची पुनरावृत्ती, आमदार लांडगे संतापले

आरोपी शेख हा शाळेतील अॅडमिन ऑफिसमध्ये काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुलींचे लैंगिक शोषण

..अन्यथा नराधम आमच्या ताब्यात द्या; पिंपरी चिंचवड्या शाळेत बदलापुरची पुनरावृत्ती, आमदार लांडगे संतापले

..अन्यथा नराधम आमच्या ताब्यात द्या; पिंपरी चिंचवड्या शाळेत बदलापुरची पुनरावृत्ती, आमदार लांडगे संतापले

Sexual Abuse Incident in Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास दिलेल्या फुगेवाडीच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींचं कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दापोडी पोलिसांत धाव घेतली. ‘आरोपीवर कठोर कारवाई करा, (Sexual Abuse) अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी आरोपीला अटक केली असून, त्याला कठोर शिक्षा होईल, अशी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून, सरफराज मन्सूर शेख (वय ३२, रा. कोंढवा पुणे) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केली असून, आरोपी गजाआड केला आहे.

Chandrasekhar Bawankule: जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष; मुख्यमंत्रिपदावरून बावनकुळेंच मोठ विधान

आरोपी शेख हा शाळेतील अॅडमिन ऑफिसमध्ये काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने बॅड टच केल्याचं सांगितलं. तसंच माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुलीबाबत देखील शेख याने असाच प्रकार केल्याचेही पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितलं आहे.

आरोपीवर कठोर कारवाई करावी. ज्यामुळे विकृत प्रवृत्तींना आळा बसेल. नाहीतर आरोपीला आमच्या ताब्यात द्या. मुलींच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी. पीडित मुलींचे कुटुंबीय दबावामध्ये आहेत. शहरात अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी जबर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे, अशी मागणी आग्रही मागणी केली. याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाने कार्यवाही करु असं सांगितलं आहे. अशी आमदार लांडगे यांनी दिली आहे.

Exit mobile version