Chandrasekhar Bawankule: जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष; मुख्यमंत्रिपदावरून बावनकुळेंच मोठ विधान
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रिपद आणि जागावाटप यावरून महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. जिंकून येण्याची क्षमता हाच आमचा जागावाटपाचा एकमेव निकष आहे. त्यानुसार सर्वजण तडजोड करतील, असं (BJP) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडमध्ये टाकला डाव; अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला?
उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी संसदीय मंडळाचाच आहे. त्यामुळे उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल. पण केव्हा हे मी सांगू शकत नाही. ज्याला उमेदवारी मिळेल, सर्वजण त्याचे काम करतील. जात-पात-धर्माच्या आधारावर उमेदवारी देण्याचं काम महाविकास आघाडी करते. आम्ही गुणवत्तावगळता कधीच या निकषांवर उमेदवारी देत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
मुंगेरीलाल के हसीन सपने
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी परिस्थिती असून मुख्यमंत्रिपदासाठीच ते आपापसांत लढत आहेत. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. नाना पटोले प्रत्येक सभेत मीच मुख्यमंत्री असा दावा करत आहेत. विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातदेखील मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी पक्षाने यावेळी संधी दिली पाहिजे. नगरसेवक असताना काय कामे केली. त्यांची माहिती दिली. या वेळी पक्षाने विधानसभेसाठी संधी देऊन आपला विचार करावा, असं इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितलं. त्यावर विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात. याबाबत पक्षाने तुमचं म्हणणे ऐकून घेतलं आहे. हे म्हणणे पक्ष श्रेष्ठीपुढे मांडण्यात येईल. पण विधानसभेसाठी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करावं लागेल. त्यामुळे वेगळा विचार करू नका, असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले आहे.