Shambhuraj Desai Statement on Districtwise Guardian Minister : राज्यात (Maharashtra Politics) 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा 15 डिसेंबर रोजी विस्तार झाला. दरम्यान काल हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप देखील जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता राज्याच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाचे (Guardian Minister Post) वेध लागलेत. राज्यात पालकमंत्रिपदाचं वाटप कधी होणार? असा देखील प्रश्न आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
VIDEO : ठाकरे बंधूंचे सूत जुळले? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत दिसले एकत्र, चर्चांना उधाण
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? हे शिंदे गटाचे नेते तसेच राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी (Shambhuraj Desai) स्पष्ट सांगितलं आहे. नुकतंच खातेवाटप पूर्ण झालेलं आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आमची खाती सुपूर्द केली जातील. विधिमंडळाचं अधिवेशन काल संपलेलं आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला जातील. त्यानंतर तिघांमध्ये चर्चा होईल, त्यानंतर पालकमंत्रिपदाचं वाटप होईल, असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय.
ठरलं! पुढील 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, CM देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
पालकमंत्रिपदासाठी अनेक मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, महायुतीत पालकमंत्रिपदासाठी कोणतीही रस्सीखेंच नाही. राज्यातील जनतेनं आम्हाला बहुमत दिलंय. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आमच्यासमोर मोठं आव्हान आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवू असं देखील देसाई म्हणाले आहेत. आमच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच नव्हती अन् पालकमंत्रिपदावरून देखील नाही असं ते म्हणाले आहेत.
राज्यात नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं. रखडलेल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर झालं. शपथविधी अगोदर एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये गृहखात्यावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अखेर गृहखाते फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि रस्ते विकास ही खाती सोपविण्यात आलीय. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय. त्यामुळे पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.