Download App

अखेर शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले ताळे; जिल्हाधिकारी अशियांनी घेतला चार्ज…

Shani Shingnapur Devsthan offices Seal करण्यात आले आहे. देवस्थानचा जिल्हाधिकारी पंकज कुमार अशिया यांनी चार्च घेतला आहे.

  • Written By: Last Updated:

Shani Shingnapur Devsthan offices Seal after Board Of Trustees Of Dismissed Collector Aashiya took charge : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे समोर येत होतं. ज्यामध्ये ॲप बनावट प्रकरण, बोगस कर्मचारी भरती घोटाळा त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या मात्र आता शनिशिंगणापूरचं विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आता देवस्थानचे सर्व कार्यालय सील करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघ महासभेत पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर अन् हिंदूत्वावर बोट, भारताचं सडेतोड उत्तर

त्यामुळे आता शनेश्वर देवस्थानचा जिल्हाधिकारी पंकज कुमार अशिया यांनी चार्च घेतला असून सर्व सूत्र आपल्या हाती घेतले आहेत. तसेच पंकज कुमार अशिया असे यांनी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आदेश केले आहे की देवस्थानचे सर्व कार्यालय सील करण्यात यावेत व माझ्या परवानगीशिवाय कुणालाही या ठिकाणी कार्यालयामध्ये माझ्या परवानगी येऊ देऊ नये असा आदेश जिल्हाधिकारी पंकज कुमार आशिया यांनी देवस्थानच्या अधिकृत अधिकाऱ्यांना केला आहे ‌.

वांगचुक यांना चोहोबाजूने घेरले ! ते पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात; बांगलादेशचा दौरा; लडाखच्या डीजीपींचा धक्कादायक खुलासा

तसेच आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की, शैनेश्वर देवस्थान संदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवून तसेच आमचे सर्व सहकाऱ्यांनी देवस्थानच्या विरोधामध्ये अनेक वेळा तक्रारी करून या देवस्थानला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढले असल्याचे आपले मनोगत व्यक्त केले.

शासन निर्णय

श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ मधील कलम ५ च्या उपकलम (१) अन्वये, “श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था व्यवस्थापन समिती” या नावाने संबोधली जाणारी समिती गठीत होईपर्यंत, सदर देवस्थान विश्वस्तव्यवस्थेचा कारभार सुरळीत, सुसूत्र, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालविला जावा, तसेच देवस्थानच्या दैनंदिन व्यवहाराचे व्यवस्थापन विनाविघ्न पार पाडले जावे, याकरिता जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची “प्रशासक” म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे.

RBI ने मृत व्यक्तींचे खाते, लॉकरबाबतच्या नियमात केले मोठे बदल; वाचा काय झाला चेंज

त्यांनी सदर देवस्थान विश्वस्तव्यवस्थेचे संपूर्ण प्रशासन, व्यवहार, वित्तीय बाबी, संपत्तीचे संरक्षण, तसेच भक्तांसाठीच्या सर्व सेवा-सुविधा यांचे व्यवस्थापन जबाबदारीपूर्वक पार पाडावे. ही नियुक्ती वर नमूद व्यवस्थापन समिती विधिपूर्वक गठीत होईपर्यंत किंवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत लागू राहील. व्यवस्थापन समिती गठीत झाल्यानंतर, या प्रशासकाची नियुक्ती आपोआप समाप्त होईल आणि त्यांनी देवस्थानचा कारभार तात्काळ समितीकडे सुपूर्द करणे आवश्यक राहील.

follow us