Download App

VIDEO : निवडणूक काळात पोलिसांच्याही गाड्यांची चेकिंग होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

निवडणूक काळात पोलिस विभागाच्याही गाड्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.

Assembly Election Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरु आहे. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केला जात आहेत. पोलिसांच्या गाड्यांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना अर्थसहाय्य पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलायं. पवारांच्या या आरोपानंतर आता पोलिस विभागाच्याही गाड्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.

कुलकर्णी म्हणाले, आमच्या तपासणी संदर्भात ज्या टीम आहेत त्यांना सर्व प्रकारची वाहने तपासण्याच्या सूचना असतात. संविधानिक पदावरील व्यक्ती असेल त्यांना निवडणूक आयोगाने नियमावली ठरवून दिलीयं. राज्यातील ज्येष्ठ राजकारण्यांनी शंका उपस्थित केल्यामुळे सर्व प्रकारची वाहने तपासण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, पुढील दिवसात पोलिसांची वाहने देखील तपासली जाणार असल्याचं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.

धनगर आरक्षणासाठी निलंगेकरांनी विधानसभेतही उठवला होता आवाज; महायुतीचं सरकार आल्यावर प्रश्न सोडवण्याचं आश्वासन

शरद पवारांनी काय आरोप केला?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप केलायं. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला.

288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 अर्ज…
राज्यातील 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2 हजार 938 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने आता 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 5 लाख अधिकारी आणि कर्मचारी काम करणार असून 2 लाख पोलिस कर्मचारी तर बाहेरील राज्यातून 142 निरीक्षक येणार आहेत. तसेच 41 पोलिस निरीक्षक असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 55 हजार शस्त्र जमा करण्यात आले असून 229 शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. तर 575 शस्त्रे परवाना रद्द करुन जमा केली आहेत.

follow us