Download App

“शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेने बजेटची सुरुवात करा”, रोहित पवारांचे अजितदादांना आव्हान

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून अर्थसंकल्पाला सुरुवात करावी, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले. 

Rohit Pawar on Maharashtra Budget : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र त्याआधीच विरोधी आमदारांना महायुती सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे आमदार  रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून अर्थसंकल्पाला सुरुवात करावी, असे आव्हान दिले. अर्थमंत्री अजित पवार यांनाच हे आव्हान असल्याचे मानले जात आहे.

रोहित पवार पुढे म्हणाले, गेल्या वेळी जे अर्थसंकल्प झाला त्याचे 42% वापरला गेले आहेत याचा अर्थ सरकारकडे पैसे नाहीत. एखाद्या निवडणुकीला सामोरं जात असतो तेव्हा लोकं भाषण ऐकत असतात. तिथे दिलेला शब्द हा महत्वाचा असतो. जो जो शब्द दिला गेला तो खरा करावा लागेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी करू ही घोषणा केली होती. आजच्या अर्थसंकल्पाची सुरुवात यानेच करावी.

लाडकी बहीण योजनेला निवडणूक काळामध्ये पैसे आधी दिले. पण आज अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख असावा. राज्यातील बेरोजगार युवकांना बेरोजगारी भत्ता दिला गेला पाहिजे. त्यामुळे आज अजित पवार काय बजेट मांडतात हे बघावं लागेल. राज्य सरकारकडून कर्ज काढले जात असल्याच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी जोरदार टीका केली.

थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता, रोहित पवार भडकले

अजितदादांच्या बदनामीचा फडणवीसांचा हेतू

कर्ज कशासाठी काढत आहात? आमदाराला विकत घेण्यासाठी पैसा आहे पण विकासासाठी नाही. लोकांच्या हितासाठी न करता निवडणुकीसाठी कर्ज काढलं असं म्हटलं जाईल. काही दिवसांपूर्वी एक अर्ध बजेट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 7 तारखेच्या भाषणात सर्व चांगल्या गोष्टी बोलल्या. मात्र सगळ्या खराब गोष्टी दादांच्या वाटेला ठेवल्या आहेत. जेणेकरून अजितदादांचं नाव खराब होईल हा हेतू दिसतो असा संशय आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांची बिले माफ करू असं जाहीर केलं होतं. निवडणुकीसाठी फक्त वापर करून घेतला. आता त्यांना फक्त गंडवण्याचं काम सुरू आहे. एखादा कारखाना असा असतो जो चांगला भाव शेतकऱ्यांना देतो. जे कारखाने चांगले आणि खराब चालतात अशांना 1100 कोटी देतात का कारण ते सत्तेत आले आहेत. सामान्य लोकांचा पैसा राजकीय हेतूने वापरला जात आहे. त्यामुळे आताचे सरकार हे सामान्य लोकांचे नाही.

मी महाकुंभात जाऊन गंगाजल आणलं

महाकुंभला जाण दर्शन घेणं एखादा व्यक्ती जात असेल तर ती धार्मिकता आहे. महाकुंभाला 30 कोटी लोकं गेली होती. जी काही धार्मिक परंपरा आहे ती जपण्यासाठी आम्ही सुद्धा गेलो होतो. मला समाधान मिळालं. तिथे पाणी प्रदूषण आहे असं राज ठाकरे म्हणाले होते. ते कुठल्या भूमिकेतून बोलत होते हे मला माहिती नाही. पण धार्मिक कार्यक्रमाबद्दल नकारात्मक बोलणं योग्य नाही. नदीमुळे त्रास होत असेल तर सरकारने विचार करायला हवा.

नदी सफाईचे पैसे गेले कुठे असा प्रश्न राज ठाकरेंचा असावा. मंदिराच्या बाबतीत निधी मोठा दिला आहे. पण खर्च एकही केलेला नाही. मी स्वतः तिथे स्नान केलं. मी काही लोकांसाठी गंगा जल आणलं. पण पाण्याची गुणवत्ता चांगली नव्हती. ते जल मी स्वच्छ केले आणि चांगल्या भावनेने दिले असे आमदार रोहित पवार म्हणाले.

“हड, मी ते पाणी पिणार नाही” राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील स्नानाबाबत वादग्रस्त वक्तव्य

follow us