थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता, रोहित पवार भडकले

थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता,  रोहित पवार भडकले

Rohit Pawar On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर 2 मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आले आहे.

मंत्री धनंजय मुंडे पुढील काही मिनिटात राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास आहे. गेल्या दोन महिन्यापासून तुम्ही हे फोटो घेऊन ज्या पद्धतीने वागत आहात त्यावरुन अप्रत्यक्षपणे तुम्ही वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करत आहोत असं आमचं मत आहे.  अजितदादांना मला सांगायचं आहे एक नागरिक म्हणून आणि पुतण्या म्हणून मला त्यांना सांगायचा आहे की आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला हवा. पंकजा ताईंनादेखील विनंती करणार आहे की, तुमचे भाऊ असो किंवा तुम्हाला निवडणुकीत मदत केली असो परंतु थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता आणि राजीनामा द्यायला लावला असता. असं माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले.

‘भयंकर कृत्य, त्यांना सुटून येऊ द्या…’ , फोटो पाहिल्यावर मनोज जरांगेंचा इशारा

तसेच फडणवीस यांना सांगायचे आहे तुमची मैत्री जे काय असेल ते कचऱ्यात टाका आणि आजच राजीनामा घ्या. आज जर राजीनामा झाला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. असा इशारा देखील रोहित पवार यांनी सरकारला दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube