Supriya Sule Press Conference : राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला आहे. याच मुद्द्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या कायद्यासंदर्भात आम्ही अनेक सूचना केल्या होत्या मात्र त्या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही. नक्षलवाद संपवला असे सरकार म्हणतात मग त्याच नक्षलवादासाठी कायदे आणत असताना आता नवीन कायदा कशाला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. खा. सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
सुळे पुढे म्हणाल्या, सरकारचा हा निर्णय संविधान विरोधी निर्णय आहे. देश कुणाच्या मर्जीने चालणार नाही. या विधेयकाचा आम्ही निषेध करत आहोत. सरकारला (Supriya Sule) विनंती आहे की हे विधायक मागे घेण्यात यावे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्न (Vice President Election) विचारला असता सुळे म्हणाल्या, मतदान गुप्त होतं तर मग तुम्हाला (प्रसारमाध्यमे) कसं कळलं की क्रॉसवोटिंग झालं.
मराठी माणसाला का बदमान करू नका
मला जो कागद दिला त्याला कुठे ही नंबर रंग नव्हता. कुठला ही वेगळा कागद नव्हता. राष्ट्रपती यांना पत्र लिहावं लागेल की काहीतरी गोलमाल आहे. 14 क्रॉसवोटिंग झाले असे सांगितले जात आहे तर मग कुठल्या राज्यातील झाले? मला माहिती नाही कोणाची मतं फुटली? 14 फुटले म्हणजे महाराष्ट्राने केले का? राज्य बदनाम होतं आहे. महाराष्ट्राची का बदनामी करताय? आमच्यावर का आरोप? राजकारण करा पण मराठी माणसाला बदनाम करू नका असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
माझी नैतिक जबाबदारी असल्याने.. आझाद मैदानावरील घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या (Nepal Protest) मुद्द्यावरही त्यांनी मत व्यक्त केले. आमची नेपाळमधील घडामोडींवर नजर आहे. या मुद्द्यावर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. सध्या जगातील अनेक देशांत अस्थिरतेची स्थिती आहे. या गोष्टी सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी (Operation Sindoor) जसे सर्व एकवटले होते त्याच पद्धतीने आताही एकत्रित येण्याची गरज आहे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.