Download App

पहाटेचा शपथविधी पार्ट २ : शरद पवार म्हणतात; भविष्यात कोण काय करेल याचा भरवसा नाही

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Speech On Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एकीकडे अनेक पक्ष मोर्चे बांधणी करता असताना मात्र सध्या राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. अदानी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मतभेद चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या आपल्या विधानांमुळे आणि भूमिकेमुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पहाटेचा शपथविधीवरही भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी भविष्यात कोण काय करेल याचा भरवसा नाही, असं वक्तव्य केलं आहे

शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…

या मुलाखतीमध्ये शरद पवार यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी पुन्हा एकदा तशा शपथविधीची शक्यता आहे का? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी भविष्यात कोण काय करेल याचा भरवसा नाही, असं संदिग्ध उत्तर दिल. पण त्याच वेळी त्यांनी तो वैयक्तिक निर्णय असू शकतो. अशी पुष्टी देखील जोडली. त्यामुळे शरद पवार यांच्या या वक्तव्यावरून अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

गेल्या काही महिन्यापासून राज्यात अजित पवार नाराज असल्याच्या आणि राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा होत आहे. त्याच काळात शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चाना तोंड फुटले आहे. मागील आठवड्यातच अजित पवार आऊट ऑफ कव्हरेज गेल्याचा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आगामी काळात राज्यात काय उलाढाली होतात, हे पाहावं लागेल.

बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

ठाकरेंनी राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही

याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतले नसल्याचा खळबळजनक दावा पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, आघाडीतील मुख्यमंत्री पद हे तिन्ही पक्षांनी एकत्र येत संख्याबळानुसार ठरवले होते. यामध्ये तिन्ही पक्षाचा सहभाग होता. अशातच राजीनामा देण्याचा निर्णय कोणी घेत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे.

पण अन्य सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेणे त्याचे जे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही, असे पवार म्हणाले आहे.

Tags

follow us