Download App

ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर करणार 40 टक्के वाढणार उत्पादन; शरद पवारांची माहिती

ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करणार असल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं.

  • Written By: Last Updated:

AI technology Sugarcane production : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चिंता असते ती उत्पादन वाढीची. यासाठी एक ना अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. दरम्यान, आता ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करणार असल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं. ते आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

GST Council Meeting: रेल्वेची सेवा जीएसटीबाहेर, पण दूधाचे कॅन, सोलर कूकर महागणार 

शरद पवार म्हणाले की, बारामतीमध्ये कृषी क्षेत्राला पुरक असे अनेक प्रयोग केले जातात. आम्ही ऊस उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्नशील होता. त्यासाठी नवी तंत्रज्ञान कसं आणता येईल याचा संशोधन संस्था सातत्याने विचार करत होती. त्यानंतर विदेशात जाऊन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यासोबत करार करून संशोधन केले.त्यांच्या सहकार्याने ऊस उत्पादन वाढीसंदर्भात प्रायोगिक तत्वावर काम केलं. त्यानंतर आता एक हजार शेतकऱ्यांची निवड करून त्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ त्यांना घेता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुमळं एका वर्षात शेतकऱ्यांचं उत्दपान चाळीस टक्के वाढेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

पुढील 5 दिवस सावधान! कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागात धो धो पावसाला होणार सुरुवात 

सध्या बारामतीत एआय तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यानंतर राज्यातच नव्हे तर देशातही अन्य शेतकऱ्यांनाही कसा लाभ देता येईल, यासाठी प्रयत्न करू, या नव्या तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येईल, असं पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी शेतीत योग्य प्रमाणात पाणी, खत घालणे, किड व्यवस्थापन ही कामे अधिक सक्षमपणे करू शकणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज