“माझं मोदींशी भांडण नाही पण..” शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
Sharad Pawar on PM Narendra Modi : मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला (Sharad Pawar) जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार केला जात नाही. म्हणून आमचा त्यांच्याशी संघर्ष आहे. आमचं काही दोघांचं भांडण नाही. त्यांनी काही माझा बांध फोडला नाही. त्यामुळे मला भांडण करायचं काही कारण नाही. संबंध आहेत. मोदी बारामतीलाही आले होते. त्यांनी भाषणात तर शरद पवारांचं बोट धरुन मी राजकारणात आलो असं मोदी म्हणाले होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
शरद पवार आज दुष्काळी दौऱ्यानिमित्त बारामती तालुक्यातील (Baramati Lok Sabha) पाणदरे या गावात आले होते. येथे शेतकरी संवाद मेळाव्यात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचा असतो नुसता सन्मानासाठी नाही. माझा सन्मान तुम्ही कितीदा तरी केलात. देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानपरिषदेत किती वर्ष आहे माहिती आहे का तुम्हाला, 56 वर्षे झाली. 1967 मध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हापासून तुम्ही मला सुट्टीच देत नाही आता काय म्हणावं तुम्हाला असे म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.
सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी
शरद पवार पुढे म्हणाले, आज देशात बदल करण्याची गरज आहे. धोरणात बदल करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. युवकांचा हिताची धोरणं असली पाहिजेत हे जर करायचं असेल तर लोकसभा अत्यंत महत्वाची आहे. आमच्या हातात सत्ता नाही. पण यावेळी लोकांनी आम्हाला साथ दिली. मी तर दहाच माणसं उभी केली होती. दहातली तुम्ही आठ निवडून दिली.
राज्यात किती जागा लढवायच्या हे आम्ही तिघांनी (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) ठरवलं. 48 जागा लढवल्या त्यातील 31 जागा जिंकल्या. आज महाराष्ट्रातून आघाडीचे 31 खासदार दिल्लीत गेलेत. हे फक्त तुमच्यामुळं शक्य झालं. कारण तुम्ही शहाणे आहात, चुका होऊ देत नाहीत. मघाशी कुणीतरी बोलताना सांगितलं की आम्ही प्रचाराला जायचो पण कुणी मिरवायचं नाही. खरं आहे मलाही लोक सांगायचे खात्रीच्या गावात प्रचाराला गेलो तरी कुणी भेटत नाही बोलत नाही अशी परिस्थिती होती. ठीक आहे त्या गोष्टी झाल्या. पण बोलत नाही म्हणून बटण दाबायला कुणी चुकलंय का?
शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला?; अजितदादांच्या विरोधात तगडी फाईट
बटण दाबायला कुणी चुकलंय का?
माणसं काही साधी नाहीत. बोलत नसली तरी मतदान केंद्रात गेल्यानंतर कोणतं बटण दाबायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. याची प्रचिती बारामतीच्या निवडणुकीत आली. शिरुरमध्ये आली. शेजारच्या नगरमध्येही आली. अशी साधी माणसं आम्ही उभी केली होती. नगरचा आमचा खासदार माहितीय का तुम्हाला? खासदार आहे, मोठा पुढारी आहे असा वाटतो का? काही नाही अगदी साधा माणूस आहे. पण कोरोना काळात माझ्या नावाने तिथं कोविड सेंटर काढलं. सोळा हजार माणसांची व्यवस्था केली. घरी गेला नाही त्याला तुम्ही निवडून दिलंत असे शरद पवार म्हणाले.