शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला?; अजितदादांच्या विरोधात तगडी फाईट
Sharad Pawar Indications given for MLA to Yugedra Pawar : राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा ‘आता विधानसभा लढविण्याची वेळ आहे’ असं म्हणत थेट विधानसभेसाठी युगेंद्र पवारांच्या (Yugedra Pawar) उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी नातवासाठी आतापासूनच साखर पेरणी सुरू केल्याचे दिसत आहे.
सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी
त्यामुळे शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच युगेंद्र यांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत अजित पवारांना तगडी फाईट दिली जाऊ शकते. त्यामुळे लोकसभेनंतर बारामतीमध्ये विधानसभेत पुन्हा पवार विरूद्द पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यासाठी सध्या शरद पवार गावा-गावात जात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना युगेंद्र पवारांच्या आमदारकीबाबत विधान केले आहे.
मोठी बातमी : वाढीव आरक्षण ठरलं गाजराची पुंगी; नितीश सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने गुंडाळला
काय म्हणाले शरद पवार?
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आता विधानसभा लढविण्याची वेळ आहे’ असं म्हणत थेट विधानसभेसाठी युगेंद्र पवारांच्या (Yugedra Pawar) उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी नातवासाठी आतापासूनच साखर पेरणी सुरू केल्याचे दिसत आहे. दरम्यान काल (19 जून) देखील शरद पवारांनी थेट युगेंद्र पवारांचं नाव घेत आता युगेंद्रला ताकद देऊ असं सूचक विधान केलं. त्यामुळं बारामतीचा दादा बदलल्याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्याला संबोधित करतांना सांगितलं की, मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध झाला असला तरी तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही. मी सध्या अनेक गावांना भेटी देत आहे. गावातील लोक सांगतात निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध झाला.
“हे असं होतं म्हणून मला बोलायला आवडत नाही”; मेळाव्यातील ‘त्या’ चिठ्ठीवर पोंक्षेंचा त्रागा
पण मी सांगतो, विरोध झाला तर विसरून जायचं. सुडाचं राजकारण आपप कधी करत नाही. पण एक गोष्ट आहे. बारामती तालुक्यातील जनतेने सिध्द केलं की नेते गावातले होते. पण त्यांचं दुकान चाललं नाही. सामान्य माणसांचं आणि साध्या माणसांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळं नवी पिढी पुढे आली. त्यामाध्यमातून गावाचा विकास होईल. ही जबाबदारी आमची राहिल. ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, असं सूचक विधान पवारांनी केलं.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत. ते शरयू ॲग्रोचे सीईओ आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे ते कोषाध्यक्षही आहेत. ते बारामती तालुका कुस्तीगीर युनियनचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी शरद पवारांना साथ दिली होती.