“हे असं होतं म्हणून मला बोलायला आवडत नाही”; मेळाव्यातील ‘त्या’ चिठ्ठीवर पोंक्षेंचा त्रागा
Sharad Ponkshe : शिवसेनेच्या वर्धापनदिनी काल मुंबईत दोन मेळावे (Mumbai News) पार पडले. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अभिनेते शरद पोंक्षे यांनी (Sharad Ponkshe) दमदार भाषणही केले. मात्र, पोंक्षे या भाषणात नाराज झाले त्यांनी आपली नाराजी स्टेजवरच बोलून दाखवली. काल वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित मेळाव्यात सुरुवातीलाच पोंक्षे यांचं भाषण झालं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपेल विचार मांडत असतानाच दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आली. यानंतर पोंक्षे चांगलेच चिडले. हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही.. अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या मेळाव्यात शरद पोंक्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर (Eknath Shinde Shivsena) बोलत होते. ते म्हणाले, आम्ही इतिहास विसरलो पण आता इतिहासाची मढी कशाला उकरून काढायची. त्यापेक्षा पुढं पाहा. या पुढं पाहण्याच्या नादात आम्ही पाकिस्तान गमावला.. अफगाणिस्तान गमावला, बांग्लादेश, अफगाणिस्तान अन् नेपाळही गमावला. चायनाचा काही भाग असे म्हणत असतानाच चिठ्ठी आली. किती वेळात संपवायच? हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही.. असे म्हणत शरद पोंक्षेंनी त्रागा केला.
आम्ही घासून नाहीं तर ठासून आलो, तुम्ही भेंडी बाजार शोधा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना ठणकावले
माझ्यानंतर जे बोलणार आहेत. थोडासा वेळ आहे का. मी एवढं पूर्ण करतो असं पोंक्षे म्हणाले. त्यावर संजय शिरसाट यांनीही भाषण चालू ठेवा म्हणून त्यांना खूण केली. पाच मिनिटांत शुभेच्छ देण्यात मला इंटरेस्ट नाही. सगळ्यांची परवानगी असेल तर पुढे बोलू का असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. होकार मिळाल्यानंतर त्यांनी पुढे भाषणाला सुरुवात केली.
यानंतर आणखी दोन चार मिनिटे त्यांनी भाषण केलं. पोंक्षे म्हणाले, अजून खूप काही बोलायचं आहे पण आता वेळ संपली आहे. कारण, वेळ संपल्याची चिठ्ठी तिसऱ्यांदा आली आहे. त्यामुळे आता मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्हा सगळ्यांना शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा असे म्हणत साडे पंधरा मिनिटांनंतर शरद पोंक्षेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.
शरद पोंक्षेंच्या भाषणानंतर शिंदे गटातील आणखी काही नेत्यांची भाषणं झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार भाषण केले. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचच सरकार येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला, मोदी ब्रॅंड नाही, ब्रॅंडी झालेत…; राऊतांचे टीकास्त्र