उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला, मोदी ब्रॅंड नाही, ब्रॅंडी झालेत…; राऊतांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला, मोदी ब्रॅंड नाही, ब्रॅंडी झालेत…; राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut On Narendra Modi : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप होत असतात. आताही राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार टीका केली. गुजरातचे सोमेगोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागले, मात्र, त्यांचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला. मोदी आता ब्रँड नाही, ब्रॅंडी झाले, अशी टीका राऊतांनी केली.

केंद्रीय मंत्र्यांना साधं ‘बेटी पढाओ’ही लिहिता आलं नाही; ‘त्या’ व्हिडिओवरुन काँग्रेस-भाजपात जुंपली 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज 58 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवसेना नेते-युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, नवनिर्वाचित खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना राऊत म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली. गुजरातचे सोमेगोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागले. पण हा शिवाजी महाराजांचामहाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या फडतूस माणसासमोर आम्ही झुकणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.

वारीसाठी सरसावला ‘पुनीत बालन ग्रुप’; ८ हजार पोलिसांना आवश्यक वस्तूंचे किट देणार 

ते म्हणाले, मोदी जन्माला आल्यावर चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आला होता, 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे मोदीचा. पण, त्यांचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला आहे.

भाजप आता आभार यात्रा काढणार आहे. अरे तूम्ही हरलाय आणि आभार यात्रा काय काढताय… मोदी हा ब्रँड होता, आता ती ब्रँडी झाली आहे. भाजपवाले त्या ब्रॅंडीचे दोन दोन घोट मारतात, अन् धन्यवाद यात्रा काढतात, असा टोला राऊताांनी लगावला.

राऊत म्हणाले की, जिथे राम तिथे भाजपचा पराभव झाला आहे. विजय विकत घ्या, वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्ने कला जात आहे. पण वारकरी यांच्या नादाला लागणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

आमच्या स्ट्राईक रेटच्या नादी लागू नका – जाधव
इंडिया आघाडीचे 30 खासदार निवडून आले आहेत, हा उद्धव साहेबांचा स्ट्राईक रेट आहे. तुम्ही 13 नेले, सहा उरले होते. त्यांनी पुन्हा 9 निवडून आणले, हा आमचा स्ट्राइक रेट आहे. आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, असा इशारा भास्कर जाधवांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज