केंद्रीय मंत्र्यांना साधं ‘बेटी पढाओ’ही लिहिता आलं नाही; ‘त्या’ व्हिडिओवरुन काँग्रेस-भाजपात जुंपली
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.

NDA Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारचं (NDA Government) कामकाज सुरू झालं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर (PM Narendra Modi) शपथ घेतलेल्या मंत्र्यांनाही खातेवाटप झालं आहे. या मंत्र्यांनीही कामाला सुरुवात केली आहे. मात्र आज एक असा किस्सा घडला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मंत्रिमंडळात उच्चशिक्षित अन् श्रीमंत मंत्री किती याचं कुतूहल सगळ्यांनाच होतं. पण, आता एका मंत्र्यांच्या कारनाम्यानं सरकार टीकेचे लक्ष्य ठरले आहे. या महिला मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी यावर खोचक प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओत केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेशही नीट लिहीता आला नाही. विशेष ठाकूर या महिला आणि बालकल्याण खात्याच्याच राज्यमंत्री आहेत.
Video : पहिले मोदींचे पाय अन् आता थेट हात; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना झालंय तरी काय?
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ब्रह्मकुंडी शाळेत स्कूल चलें हम हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी त्यांना फलकावर साधा संदेशही लिहीता आला नाही. त्यांनी ‘बेढी पडाओ बच्चाव’ असं लिहून आपलंच हसू करून घेतलं. या प्रकारानंतर राजकारणही जोरात सुरू झालं आहे. काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रवक्ते केके मिश्रा यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटवर हा व्हिडिओही शेअर केला आहे. याला देशाचं दु्र्दैव समजायचं की लोकशाहीचा नाईलाज अशी खोचक टीका त्यांनी केली. त्यांच्य या टीकेवर भाजपनेही जोरदार पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते हितेश वाजपेयी म्हणाले, काँग्रेसच्या काळात आदिवासी मुलं कोणत्या काळात शिक्षण घेऊ शकल्या याचा विचार करा. राहुल गांधींना जे जमलं नाही ते या आदिवासी मुलीनं करून दाखवलं. अगदी कठीण परिस्थितीत बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. देश आणि देशातील महिला काँग्रेसच्या या महिलाविरोधी मानसिकतेला कधीच माफ करणार नाहीत असे प्रत्युत्तर वाजपेयी यांनी दिले.
Modi Cabinet Meeting: केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; पटेल, तटकरेंना मंत्रिपद