Baramati Loksabha : आधी पैशांचा, गुंडांचा वापर नव्हता पण..,; रोहितदादांनी घडलेलं सांगितलं

Baramati Loksabha : आधी पैशांचा, गुंडांचा वापर नव्हता पण..,; रोहितदादांनी घडलेलं सांगितलं

Rohit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) आधीच्या काळात पैशांचा, गुंडांचा वापर झाला नव्हता, पण आता होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलायं. दरम्यान, लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या टीकेला सडेतोडपणे उत्तरंही दिली आहेत.

पराभव झाला तरी खचून जाऊ नये; लोकसभा निकालापूर्वीच अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश

रोहित पवार म्हणाले, माझ्यासोबत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासह मला निवडणुकीत होत असलेल्या चुकीच्या गोष्टी आवडत नसायच्या. त्यांच्याकडून काही गोष्टींचे व्हिडिओ मला येत होते. तेच व्हिडिओ मी सोशल मीडियावर पोस्ट करीत असत. त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधकांकडून होत असलेला गुंडाकडून प्रचार, पैसे वाटल्याचे प्रकार, यासोबतच पीडीसीसी बॅंक रात्रीच्यावेळी उघडल्याचा प्रकार घडला असल्याचं रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

ससूनमधील डॉक्टरला कोणी मॅनेज केले? आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये माझ्यासोबत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ज्या ठिकाणी चुकीची कामे होत होती. ही विरोधकांची चुकीची कामे कार्यकर्त्यांना आवडत नसायची. कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगत असत. मलाही अशा गोष्टी आवडत नसायच्या, त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही उघड करत असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजितदादांनीच तिकीट दिलं :
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, अजिदादांकडून रोहित पवारांवर जोरदार टीका तर कधी खिल्ली उडवल्याचं दिसून आलं. या टीकांवर रोहित पवारही मागे राहिल्याचं दिसून आले नाहीत, त्यांनीही अजितदादांना सडेतोडपणे उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं होतं. रोहित पवारांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत मीच सांगितलं असल्याचा दावा अजितदादांनी केला. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, मला अजितदादांनीच तिकीट दिलं असून उमेदवारांना तिकीट देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शरद पवार यांनी अजित पवार यांनाच दिली होती. त्यामुळे अजितदादांनी मला तिकीट दिलं असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज