पराभव झाला तरी खचून जाऊ नये; लोकसभा निकालापूर्वीच अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश

पराभव झाला तरी खचून जाऊ नये; लोकसभा निकालापूर्वीच अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश

Ajit Pawar : निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपलं गेलं पाहिजे असं सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असं आवाहनही अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या बैठकीत केलं. (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

तर मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेणार का? पुणे कार अपघात प्रकरणात अंजली दमानियांची थेट मागणी

येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबववले जातील असंही अजित पवार यांनी सांगितलं. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुती सरकारच्या काळात घेतले आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली.

लोक देतील तो कौल मान्य करून पुढ जायला हवं. जे काही घडेल ते मान्य करायला हव असंही यावेळी अजित पवार म्हणाले. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागच्यावेळी 41 जागा भाजप युतीच्या होत्या. तर विरोधक 7 जागांवर होते. याचमुळे आपल्याला यावेळी कमी जागा मिळाल्या. तसंच, साताऱ्याला राज्यसभेची जागा आपण देणार आहोत तिथ इतरांनी मागणी करू नये असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

पोर्शे कार अपघातावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी

निवडणुका हे काही सत्तेत येण्याचं साधन नाही. आणि तस आपण मानतही नाही. निवडणुका या पाच वर्षांच्या कामाचे मूल्यमापन लोक करतात आणि आपल्याला कौल देतात. त्यामुळे आपण कार्यकर्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असो असंही अजित पवार यावेळी म्हणाले. आता आपण नवी राजकीय भूमिका घेतली आहे. विधानसभेला 54 जागा निवडून आलो होतो. आता यावेळी जागांबाबत काळजी वाटणं साहजिक आहे. मात्र, काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्वांचा मान सन्मान ठेवला जाईल असही अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज