Sharad Pawar Resigns : कार्याध्यक्षपदाबाबत जयंत पाटलांकडून नवी अपडेट…

Silver Oak Ncp Meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन तीन दिवसांपासून राज्यात चांगलंच वातावरण ढवळून निघत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरु होतीच आता कार्याध्यक्षपदाचीही चर्चा रंगली आहे. Gautam Gambhir: विराटच नव्हे, तर कॅप्टन कूल धोनीलाही डिवचले, भारतीय संघातील खेळाडूचा गौप्यस्फोट शरद पवारांनी राजीनामा न देता कार्याध्यक्षपदाची निर्मिती करुन शरद पवारांसोबत कार्याध्यक्ष काम […]

Jayant Patil

Jayant Patil

Silver Oak Ncp Meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन तीन दिवसांपासून राज्यात चांगलंच वातावरण ढवळून निघत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरु होतीच आता कार्याध्यक्षपदाचीही चर्चा रंगली आहे.

Gautam Gambhir: विराटच नव्हे, तर कॅप्टन कूल धोनीलाही डिवचले, भारतीय संघातील खेळाडूचा गौप्यस्फोट

शरद पवारांनी राजीनामा न देता कार्याध्यक्षपदाची निर्मिती करुन शरद पवारांसोबत कार्याध्यक्ष काम करणार असल्याचं मत राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या बैठकीत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाच्या प्रस्तावाबाबत विचारल्यानंतर त्यांनी नाही नाही, असा दोनवेळा उल्लेख करीत पवारांकडे दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.

नोकरीवर गदा! ‘ही’ कंपनी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देणार

तसेच, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेऊन पक्षात कार्याध्यक्ष पदाची निर्मिती करुन पवारांच्या संमतीने नेत्याची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव नेत्यांनी दिला असल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. अजित पवार यांनी ही माहिती दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदानंतर आता कार्याध्यक्षपदाचीही चांगलीच चर्चा रंगत असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सदस्य समितीची बैठक आज यशंवतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्यावर चर्चा झाली. चर्चेअंती शरद पवारांचा राजीनामा सदस्य समितीने फेटाळला आहे. त्यामुळे आता शरद पवार पुढील काळात काय भूमिका घेणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version