नोकरीवर गदा! ‘ही’ कंपनी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देणार
Cognizant to lay off 3500 employees : दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) लवकरच 3,500 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. सीईओ रवी कुमार एस यांनी खर्च कमी करण्यासाठी हजारो कर्मचार्यांना काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. दरम्यान कंपनीच्या या निर्णयामुळे हजारोंच्या नौकरीवर गदा आली आहे.
कॉग्निझंट ही यूएस कंपनी आहे. परंतू तिच्या कामकाजाचा मोठा भाग भारतात देखील आहे. अमेरिकेसह युरोपीय देशांत असलेल्या मंदीचा परिणाम आयटी कंपन्यांच्या कमाईवर झाला आहे. कॉग्निझंटमध्ये सध्यस्थितीत 3 लाख 55 हजार 300 कर्मचारी आहेत. कॉग्निझंटने त्याचा आर्थिक अहवाल जाहीर केला असून त्याच्या नफ्यात किरकोळ म्हणजे केवळ तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. कंपनीचा एकूण महसून हा 4.81 अब्ज डॉलर्स असून हा महसूल 0.3 टक्क्यांनी कमी झाल्याचं स्पष्ट आहे.
तंत्रज्ञान उद्योगात टाळेबंदी
कॉग्निझंट ही एकमेव टेक कंपनी नाही जिने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यापूर्वीही Wipro, Amazon, Accenture, Infosys, IBM, Google, Meta आणि Twitter सारख्या कंपन्यांनीही गेल्या काही महिन्यांत टाळेबंदीची घोषणा केली होती. सध्या स्थितीला आयटी सेक्टर अत्यंत कठीण काळातून जात आहे. दरम्यान कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर हजारो लोक नोकऱ्या शोधत आहे. सध्या स्थितीला नोकरीची बाजारपेठ अत्यंत स्पर्धात्मक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
SRH vs KKR : रिंकू आणि नितीशची धडाकेबाज खेळी, कोलकाताचे हैदराबादसमोर 172 धावांचे लक्ष्य
मेटा 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कपात या महिन्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून सुरू होईल. मेटाने यापूर्वी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.