मणिपूर हिंसाचार ! दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

मणिपूर हिंसाचार ! दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) उसळला आहे. याला आळा बसावा यासाठी आता सरकारने देखील कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मणिपूर सरकारने हिंसाचार करणाऱ्या दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहे. तसेच हिंसाचारग्रस्त भागात जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. राज्यात पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

मैतई समाजाला आदिवासी समाजात घेण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दंगल उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दंगलखोरांना गोळ्या झाडण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. परिस्थिती अतिगंभीर असल्याने लष्कर आणि आसाम रायफल्सच्या 55 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहे. तसेच तब्बल नऊ हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या
बिगर आदिवासी मैतई समाजाला आदिवासींचा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू आहे. या मागणीविरोधात ‘ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर’तर्फे ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला होता. मात्र, यादरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात हाणामारी झाली व मोठा हिंसाचार उसळला.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय

मैतेई समुदायाच्या मागणीवर विचार करण्याचे निर्देश
मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समुदायाच्या मागणीवर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच येत्या 4 महिन्यांत केंद्राकडे शिफारसी पाठवाव्यात असे देखील सांगण्यात आले आहे. या आदेशानंतर आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार सुरू झाला.

Honey Trap : डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक; पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय

हिंसाचार रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर
आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मात्र हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नव्हता. अखेरीस परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने लष्कर आणि आसाम रायफल्सला पाचारण करण्यात आले. राज्यातील इंफाळ पश्चिम, काकचिंग थौबल, जिरीबाम, बिष्णुपूर, चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल येथे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube