Sharad Pawar Special Interview on Letsupp Marathi : राहुल गांधींबद्दल दहा-पाच वर्षांपूर्वी जे चित्र होत आणि आज जे चित्र याच्यामध्ये प्रचंड फरक आहे.उदाहरणार्थ त्यांनी जी भारत जोडो यात्रा काढली त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न समजली, अनेक लोकं समजली. राहुल गांधींनी हे काम फार चांगलं केलं. कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत त्यांनी ही यात्रा काढली. (Rahul Gandhi) या यात्रेनंतर त्यांच्या वागण्यात मोठा बदल झाला. सुरूवातील त्यांना कुणी पप्पू म्हणायचं आणखी काही म्हणायचं आज तसं कुणी काही म्हणत नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं कौतूक केलं. ते (Letsupp Marathi ) लेट्सअप मराठीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
एक सभ्यता त्यांच्याकडे आहे
राहुल गांधी यांची कष्ट करण्याची तयारी आहे. विषय समजून घेण्याची तयारी आहे. मी कधी फोन केला. भेटायचं आहे मी येतो म्हटलं तर ते मला कधी येऊ देत नाहीत. ते स्वत: माझ्याकडे येतात. तुमच्या त्यांच्याकडे एक वागायची पद्धत आहे. त्यांच्यामध्ये एक सभ्यता आहे आणि सुसंस्कृतपणा आहे. असा अनुभव सांगत पुर्वीपेक्षा राहुल गांधींमध्ये फार मोठी सुधारणा झाली आहे असंही पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी सुसंस्कृत राजकारणाबद्दल बोलताना याच मुलाखतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी आठवण सांगितली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभागृहाबद्दल कशी काहीच किंमत नाही याची उकलही पवारांनी या मुलाखतीत केली आहे.
माफी मागितली Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला
विदार्थीदशेत मी महाराष्ट्र विधानसभेच्या गॅलरीतून विधानसभेच कामकाज पाहायला आलो होतो. एसएम जोशींनी काही प्रश्न विचारले. त्यावर एका नवीन तरुण मंत्र्याने उत्तर दिलं. एस. एम. जोशींनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. मंत्र्यांनीही तेच उत्तर दिलं. एस.एमला स्पष्टीकरण हव होत म्हणून त्यांनी तो प्रश्न पुन्हा उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांनी अध्यक्षांना उद्देशून सांगितलं यांना एकदा दोनदा उत्तर सांगितलं तरी ते काही यांच्या डोक्यात शिरत नाही. मी कितीदा सांगितलं म्हणजे यांच्या डोक्यात शिरेल असं उत्तर दिलं. यशवंतराव चव्हाण होते मुख्यमंत्री. ते लगेच उभे राहिले आणि विधानसभा अध्यक्षांना म्हणाले माझ्या तरुण सहकाऱ्याने उत्तर दिलं ते चुकीच आहे त्यामुळे मी सभागृहाची आणि विरोधी पक्षनेते एस.एम जोशी यांची माफी मागतो ही आठवण सांगत पंतप्रधान मोदींचा सभागृहातील सध्याचा वावर यावर पवारांनी यावेळी भाष्य केलं.