…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar on Narendra Modi tenure as PM : पुर्ण बहुमतात नसलेल्या भाजप सरकारला पाठिंबा दिलेल्या चंद्राबाबू आणि नितिश कुमारांच्या मागण्या वाढणार. मोदींना (Narendra Modi) मात्र केवळ दोन राज्य नाही तर देश सांभाळायचा आहे. त्यामुळे या सरकारच्या कालावधीवर परिणाम होऊ शकेल. ते पाच वर्षांचा कार्यकाळ (tenure as PM) पूर्ण करतील का हा प्रश्नच आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यांच्याशी संपादक योगेश कुटे यांनी साधलेल्या संवादादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

Dharmveer 2 चा अंगावर काटा आणणारा दमदार टीझर रिलीज; चित्रपट दोन भाषांत प्रदर्शित होणार

मोदी सरकार आगामी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी साधारणतः खासदारांचा जो एक अंदाज घेतला आहे. त्यानुसार कुणालाही पुन्हा निवडणुका नको आहेत. निवडणुका पुन्हा घ्यायच्या त्याचा खर्च त्याचा वेळ या सगळ्या गोष्टी येतात. तसेच या गोष्टी सरकार जोपर्यंत हे एकत्र काम करतात तोपर्यंत येणार नाही.

12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान! महायुती-मविआमध्ये मतांसाठी रस्सीखेच, कुणाचं किती संख्याबळ?

प्रश्न कुठे येईल? तर प्रश्न आंध्र सरकार चंद्रबाबूंचं किंवा बिहारकडून काही मागण्या सतत केंद्र सरकारकडे विशेषतः प्रधानमंत्र्यांकडं राहतील. आणि त्या मागण्यांचं स्वरुप इतकं मोठं असेल की केंद्र सरकारच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे त्यांची मागण्यांची भूक ते जोपर्यंत भागवताहेत तोपर्यंत या सरकारला अडचण नाही. पण उद्या त्याची शक्यता वाटत नाही. पण मोदींना असं वाटलं की दोनच राज्यांपुरती अनुकूल भूमिका घेऊन चालणार नाही.

एकदा फटका बसला आता गाफीलपणा नको; महायुतीच्या मेळाव्यात शिंदेंचा युतीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र

देश बघायला पाहिजे आणि जर ते होत नसेल तर स्वच्छ भूमिका घेण्याची त्यांची तयारी राहिली. तर कदाचित या सरकारच्या कालावधीवर परिणाम होऊ शकेल. पण मला आता असं दिसतंय काही करून सत्ता टिकवायची हे धोरण मोदींचं दिसतंय त्यांचा विरोधकांबद्दलचा दृष्टीकोन अधिक प्रखर झाला आणि मित्र पक्षांबद्दल अतिशय विनम्रतेचा झाला अशी भूमिका घेऊन चालताहेत तोपर्यंत या सरकारला मला अडचण दिसत नाही. असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांचा कार्यकाळ आणि भाजप सरकारच्या स्थिरतेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube