Download App

Sharad Pawar : वर्ध्यात टेक्सटाईल पार्क उभारणीसाठी पंतप्रधानांशी बोलू…!

  • Written By: Last Updated:

वर्धा : उद्योग Industry) उभारणीसाठी वर्धा परिसरात अनेक बंधन आहेत. ती सर्व केंद्र सरकारने घातली आहेत. त्यामुळे येथील उद्योजकांना व्यापार, व्यवसाय करताना अडचणी येत आहे. मात्र, प्रामुख्याने वर्ध्यात टेक्सटाईल पार्क उभे करण्यासाठी आपण सर्व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटू आणि हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यापाऱ्यांना दिले.

वर्धा येथे संयुक्त व्यापार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘व्यापारी संवाद’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे बोलत होते. व्यापार करताना येणाऱ्या अडचणी शरद पवार यांच्यासमोर व्यापार समितीने मांडल्या. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, वर्धा येथील व्यापारी जागरूक असल्याचे पाहून आनंद वाटला. छोटे-मोठे प्रश्न असले तरी संधी मिळेल तिथे मांडणे ही तुम्हा सर्व व्यापाऱ्यांची भूमिका चांगली आहे. तुमच्या सर्व अडचणी राज्य पातळीवरील तसेच केंद्र पातळीवरील सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Tags

follow us